अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

मुंबई । अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोणतीच लक्षणं जाणवत नसल्याने सध्या त्या घरीच क्वारंटाइनमध्ये आहेत. निवेदिता यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या काम करत असलेल्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत भूमिका साकारणाऱ्या इतर कलाकारांचीही करोना चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या सर्वांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे.

मात्र पुढील दोन दिवसांत शूटिंगला सुरुवात होईल. निवेदिता सराफ क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर शूटिंगसाठी उपस्थित राहतील. मालिकेच्या सेटवरील सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचं मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like