अमरावती । खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यांनतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा सुद्धा कोरोनाबाधित झाले आहेत. रवी राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यापूर्वी चारच दिवसापूर्वी नवनीत आणि रवी राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांनतर आज नवनीत राणा यांच्या पाठोपाठ रवी राणा यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आमदार रवी राणा यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी आमदार रवी राणा हे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कोरोनाबाधित स्वूय सहायक्काच्या संपर्कात आल्याने त्यांना मुंबईमध्येच गृह विलगीकरणात रहावे लागले होते. परंतु मुंबईवरुन परतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या वडिलांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना पुढील उपचाराकरता नागपुर येथील व्होकार्ट रूग्णालयामध्ये हलविण्यात आले होते.
दरम्यान, आज गुरुवारी नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले.रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”