सांगली प्रतिनिधी । मिरज येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत अनोळखी इसमाच्या डोक्यात राजू जाधव याने दगड घालून खून केला. घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या खुनातील आरोपी राजू जाधव हा स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिरज मार्केटमधील महापालिकेच्या मोकळ्या जागेतील अंधारात दोन फिरस्ते व्यसन करीत होते. दोन दिवसांपासून हे फिरस्ते तेथे होते. अनोळखी इसमाने राजू जाधव याला दगड मारला होता. त्याचा राग मनात धरून राजू जाधव याने अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड घातला. दगड खातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. डोक्यात दगड घातल्यानंतर तो फिरस्ती मिरज शहर पोलिसात येवून मी एकाच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगितले.
राजुने दिलेल्या माहितीवरून पोलिस तात्काळ तेथे पोहोचले. त्या जखमी इसमाला उपचारासाठी मिरज शासकीय रूग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. सदर मृत इसमाचे नाव समजू शकले नाही. जाधव यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या दोघांनाही गांजाचे व्यसन होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.