हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय श्रीरामचा नारा दिला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे अस फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे.
दरम्यान, अण्णांशी गेल्या आठवड्यापासून आमची चर्चा सुरु आहे. आजच्या बैठकीत काही मार्ग निघेल असं आम्हाला वाटतंय. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींवर निर्णय देखील घेण्यात आले आहेत. असही फडणवीसांनी सांगितल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’