हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आक्रमक फलंदाज युसूफ पठाण यांच्यानंतर आता स्टार क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथला देखील करोनाची लागण झाली आहे.विशेष म्हणजे बद्रीनाथ सुद्धा रोड सेफटी स्पर्धेत सहभागी होता. त्यामुळे वर्ल्ड रोड सेफटी स्पर्धा अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती बद्रीनाथने ट्विट करत दिली. बद्रीनाथ म्हणाला, ”माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला या आजाराची सौम्य लक्षणे आहेत. मी करोनासंबधित नियमांचे पालन करत असून घरी क्वारंटाइन झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य ती काळजी घेत आहे.”
— S.Badrinath (@s_badrinath) March 28, 2021
यापूर्वी सचिन- युसुफ कोरोनाच्या विळख्यात
दरम्यान यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युसुफ पठाण यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेची बाब ठरत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group