प्रियकरासोबत पत्नी रंगेहाथ सापडली, संतप्त झालेल्या पतीने उचलले भयानक टोकाचे पाऊल

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे पतीनेच आपल्या पत्नीला विजेचा शॉक देऊन मारून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर पतीने हे हादरवून सोडणारे कृत्य केले आहे. याप्रकरणी आरोपी पतीला म्हणजेच रामविलास नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या अटकेनंतरच त्याने आपल्या गुन्ह्याची देखील कबुली पोलिसांना दिली आहे. आता या संपूर्ण घटनेमुळे रायबरेली परिसर हादरून गेला आहे.

नक्की काय घडले?

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा प्रियकर घटनास्थळावरून पळून गेल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. नाही तर त्याची देखील हत्या करण्याचा विचार आरोपी रामविलासच्या मनात होता. सोमवारी रात्री रामविलासने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. ज्यामुळे त्याचा पारा चढला. यानंतर त्याने या दोघांना देखील वेगवेगळ्या खोलीत बंद केले. याचवेळी आरोपी रामविलासने त्याच्या पत्नीला विजेचा शॉक दिला. यामुळे ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला मारहाण देखील केली त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. या वेळेसच महिलेच्या प्रियकराने देखील प्रयत्न करून तेथून पळ काढला.

आरोपी रामविलासच्या शेजारच्यांनी सांगितले की, मध्यरात्रीच्या वेळी घरातून ओरडण्याचे आवाज येत होते. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ज्यावेळी काही शेजारच्यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा रामविलासच्या हातात एक लांब वायर आणि वेल्डिंगचा रॉड होता. तर त्याची पत्नी मृत अवस्थेत खाली पडली होती. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींनी देखील पोलिसां जवळ आपला कबुली जबाब दिला आहे. ज्यामुळे त्याच्यावर आता पुढील कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, यापूर्वी देखील उत्तर प्रदेशमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये आपल्या पतीकडूनच पत्नीची हत्या करण्यात आली आली. या घटनेमध्ये देखील प्रियकरा सोबत संबंध असल्यामुळे पतीने पत्नीचा जीव घेतला आहे. या दांपत्याला चार मुले आहेत. आरोपी रामविलास वेल्डिंगचे काम करतो. तो रात्री उशिरा येत असल्यामुळे त्याचा गैरफायदा पत्नीने घेतला असल्याचे रामविलासचे म्हणणे आहे. त्यांच्या अनैतिक संबंधांमुळेच पत्नीवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचे रामविलासने पोलिसांना सांगितले आहे.