स्फोटानंतर काबूल विमानतळावर मृतदेह विखुरले, नाल्याचे पाणीही झाले लाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्ले झाले. ताज्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. काबूल विमानतळावरील हल्ल्याची चित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. अफगाणिस्तानमधील वेदना आणि भीतीची कहाणी ही एक वास्तविकता आहे आणि तालिबानची आश्वासने किती खोटी आहेत हे यावरून दिसून आहे. या दोन आत्मघाती हल्ल्यानंतर विमानतळालगतच्या नाल्यात मृतदेह आणि जखमींचा ढीग साचला होता. लोकांना बाहेर काढल्यावर नाल्यातील पाणी लाल झाले.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनने सांगितले-“पहिला स्फोट गुरुवारी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एबी गेटवर झाला. थोड्याच वेळात, विमानतळाजवळील बॅरन हॉटेलजवळ दुसरा स्फोट झाला. ब्रिटिश सैनिक इथेच थांबले होते. तीन संशयित विमानतळाबाहेर दिसले. त्यापैकी दोन आत्मघाती हल्लेखोर होते तर तिसऱ्याने बंदूक आणली होती. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर स्फोट झाले आणि हवेत धूळ उडाली. जोपर्यंत धूर कमी झाला, तोपर्यंत अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सगळीकडे रक्तच रक्त पसरले होते. तालिबानच्या क्रूर राजवटीपासून आपला जीव वाचवण्यासाठी इतर देशांत निर्वासित होण्यास इच्छुक असलेली लोकं गेल्या अनेक दिवसांपासून काबूल विमानतळावर थांबले होते. या लोकांनी स्फोटांमध्ये आपल्या आयुष्याची लढाई गमावली.

वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक रुग्णालयात मृतदेह ठेवत आहेत. आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनी (ABC) च्या मते, विमानतळाच्या नॉर्थ गेटवर कार बॉम्बस्फोटाचा धोका आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील अमेरिकन दूतावासाने नवीन अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी हल्लेखोरांना कठोर इशारा दिला आहे. ते म्हणाले की,” दहशतवाद्यांना शोधून मारले जाईल.”

अफगाणिस्तानचे कार्यवाहक अध्यक्ष अमरुल्लाह सालेह म्हणाले की,” आमच्याकडे असलेले पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की, IS-K चे तालिबान आणि हक्कानी नेटवर्कशी संबंध आहेत. ISIS शी तालिबानचे संबंध नाकारणे हे अगदी त्याचप्रमाणे आहे जसे की पाकिस्तानचे क्वेटा शूराबद्दल आहे. काबूलमधून लोकांना बाहेर काढण्याचे मिशन सुरूच राहणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. काबूल हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचा ध्वज 30 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत अर्ध्यावर राहणार आहे.