मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणासाठी तरूणाने केली आत्महत्या! पोलिसांकडून तपास सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासोबत आता राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, धनगर आरक्षणासाठी सांगली तालुक्यातल्या कुणीकोनूर येथील आबाचीवाडीमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बिरुदेव वसंत खर्जे असे या तरुणाचे नाव असून त्याने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे. तसेच, संबंधीत व्यक्तींची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

राज्यात मराठा समाजाबरोबर धनगर समाजाकडून देखील आरक्षणाची तीव्र मागणी केली आहे. या मागणीसाठी अनेक आंदोलनंही करण्यात आलेली आहेत. मात्र अद्याप सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचललेली नाहीत. अशातच आता, धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी बिरुदेव वसंत खर्जे या तरूणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बिरुदेव या तरूणाने शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरुदेव याने धनगर आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे.

त्यामुळे सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, राज्यात आरक्षण मागण्यासाठी धनगर समाज देखील आंदोलन करत असताना बिरुदेव याने आरक्षणासाठीच आत्महत्या केल्यामुळे राज्यातील वातावरण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुनील कावळे या तरुणाने मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाच्या खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर मराठा समाजाने आक्रमकाची भूमिका घेतली आहे.