Air India च्या विक्रीनंतर त्याच्या सहाय्यक कंपन्यांचे केले जाणार मॉनिटायझेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट म्हणजेच दीपम (DIPAM) सचिव तुहिनकांत पांडे यांनी सांगितले आहे की,”एअर इंडियाच्या खाजगीकरणानंतर सरकार आता अलायन्स एअरसह त्याच्या इतर चार उपकंपन्यांकडून 14,700 कोटी रुपयांच्या लँड बिल्डिंग सारख्या नॉन-कोर एसेट्सच्या मॉनिटझेशनवर गुंतवणूक करणार आहे.

8 ऑक्टोबर रोजी सरकारने जाहीर केले की, टाटा सन्सने 18,000 कोटी रुपयांची कर्जबाजारी एअर इंडिया खरेदी करण्यासाठीची बोली जिंकली आहे. यामध्ये 2,700 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 15,300 कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. हा करार डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे

AIAHL ला सहाय्यक कंपन्या आहेत
पांडे म्हणाले, “ DIPAM आता एअर इंडियाच्या सहाय्यक कंपन्यांच्या कमाईच्या योजनेवर काम करेल. या सहाय्यक कंपन्या भारत सरकारच्या एअर इंडिया एसेट होल्डिंग लिमिटेड (AIAHL) सोबत आहेत. सहाय्यक कंपन्यांची विक्री सुरू होऊ शकली नाही कारण त्या सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. जोपर्यंत एअर इंडिया विकली जात नाही, तोपर्यंत आम्ही इतर गोष्टींकडे जाऊ शकत नाही. ”

AIAHL ची स्थापना 2019 मध्ये झाली
एअर इंडियाच्या विक्रीसाठी, सरकारने एअर इंडिया समूहाचे कर्ज आणि नॉन-कोर एसेट्स ठेवण्यासाठी 2019 मध्ये AIAHL ही विशेष उद्देश असलेली कंपनी स्थापन केली होती. एअर इंडियाच्या चार सहाय्यक कंपन्या आहेत – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, एअरलाईन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड, एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड आणि हॉटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आहेत.