हा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियर भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्याला जेव्हा कधी भारताबद्दल विचारलं जातं तेव्हा तो भारतीयांची तोंड भरुन स्तुती करतो. यावेळी त्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा टॉम हँक्स असं तो म्हणाला. शिवाय आमिरसोबत काम करण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली.

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आयर्नमॅन उर्फ आरडीजेने बॉलिवूड चित्रपटांवर भाष्य केलं. तो म्हणाला, “मी बॉलिवूड चित्रपट आवडीने पाहातो. परंतु त्यामध्ये मला आमिर खानचे चित्रपट जास्त आवडतात. ‘लगान’ हा चित्रपट पाहून मी त्याचा फॅन झालो. त्याने या चित्रपटात कमालीचा अभिनय केला आहे. त्याला पाहून मला टॉम हँक्स आठवतात. मी तर आमिरला बॉलिवूडचा टॉम हँक्सच म्हणेन. संधी मिळाली तर मला आमिरसोबत काम करायला नक्की आवडेल.”

टॉम हँक्स हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. ‘फॉरेस्ट गम्प’, ‘कास्ट अवे’, ‘कॅप्टन फिलिप्स’, ‘कॅच मी इफ यु कॅन’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांना आपल्या जबरदस्त अभिनयासाठी दोन वेळा ऑस्कर पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

You might also like