धक्कादायक ! तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने रागाच्या भरात एकाची हत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – रागाच्या भरात काही जणांचा ताबा सुटतो आणि ते भयंकर कृत्य करतात. अहमदनगरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये काही तरुणांनी माळरानावर एकत्र जमून धिंगाणा घातल्याच्या कारणावरून एका तरुणाची थेट हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव शरद वाघ असे आहे तो नगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी या ठिकाणी राहतो. मृत शरद सोमवारी सायंकाळी आपल्या काही मित्रांसोबत पिंपळगावातील माळरानात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. यानंतर त्यांनी माळरानात मोठ्या आवाजात धिंगाणा घालायला सुरुवात केली. तेव्हा बराच काळ सुरू असलेल्या धिंगाण्यावरून त्यांचा परिसरातील काही लोकांसोबत वाद झाला होता. या वादातून काही जणांनी शरद याची हत्या केली.

या प्रकरणी मृत तरुणाचे चुलते बाळासाहेब वाघ यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मल्हारी ऊर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषिकेश आल्हाट आणि मारिया आल्हाट या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजून कोणालाच अटक केली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात येत आहे.