चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर येथील प्रसिद्ध जलयोग (jal yogasana) साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. कृष्णाजी नागपुरे हे जलयोग (jal yogasana) करणारे सर्वाधिक वयस्कर व्यक्ती आहेत. नागपुरे यांचं वय 85 वर्ष असून गेल्या 70 वर्षांपासून ते जलयोग (jal yogasana) प्रसाराचं काम करत आहेत. आज त्यांनी 37 प्रकारच्या योगासनांचं (jal yogasana) आणि योगमुद्रांचं 37 मिनिटात सादरीकरण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये या अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
योगासन करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती
कृष्णाची नागपुरे यांचे वय सध्या 85 वर्षे आहे. तरीही ते पाण्यात पोहतात. नुसते पोहतच नाहीत. तर पाण्यात ते सहज बराच वेळ काढू शकतात. या उतरत्या वयात त्यांनी 37 मिनिटे पाण्यात राहून 37 प्रकारची योगासनं (jal yogasana) केलीत. याची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अशाप्रकारची योगासन करणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.
पाण्यात केला योगा
21 जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. चंद्रपुरातील कृष्णाजी नागपुरे यांनी जलतरण तलावात योगसाधना (jal yogasana) केली. जलतरण तलावातल्या पाण्यावर श्वास आणि लयबद्दता सांभाळून त्यांनी 20 प्रकारची योगासन केली होती. वयाच्या 85 व्या वर्षी पाण्यात योगासनं करून त्यांनी तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
हे पण वाचा :
HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल !!!
काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पहा कधी होणार मतदान
भारत-पाक लढतीआधी भारताला मोठा धक्का !!!
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी मिटणार; उद्यापासून 100 वाहतुक कर्मचारी तैनात राहणार
Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!