वृत्तसंस्था। केंद्रात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. या बैठकीत शेती व शेतीशी संबंधित उद्योगांच्या ३ लाखांपर्यंतच्या कर्जफेडीची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकरी हिताचे जे निर्णय घेण्यात आले आहेत त्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे तोमर यांनी सांगितले.
या बैठकीत सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) ५० -८३% वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे ते म्हणाले. चालू वित्तीय वर्षात (२०२०-२१) भाताचे समर्थन मूल्य १८६८ रु प्रति क्विंटल करण्यात आले आहे. ज्वारीचे समर्थन मूल्य २६२० रु प्रति क्विंटल तर बाजरी चे समर्थन मूल्य २१५० रु प्रति क्विंटल करण्यात आले आहे. यासोबतच नाचणी, भुईमूग, मूग, सोयाबीन, तीळ आणि कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत ५०% वाढ करण्यात आली आहे.
Minimum support prices (MSP) for 14 kharif crops increased by 50- 83%, to provide relief to the farmers: Union Minister Narendra Tomar pic.twitter.com/9tnuG0c0WY
— ANI (@ANI) June 1, 2020
यावेळी त्यांनी सरकारने या कठीण परिस्थितीतही शेतकरी आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित केले असून त्यांच्यासाठी सरकार सदैव कार्यरत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संकटकाळातही शेतकऱ्यांनी अधिक पीक घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मक्याच्या पिकात ५२% वाढ झाली आहे. तसेच शासनाने ९३ मॅट्रिक टन भाताची खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.