पवारवाडीत बैलगाडी शाैकीन व आयोजकांच्यात राडा : वीस जणांवर गुन्हा दाखल

Race

फलटण | पवारवाडी येथे बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या बैलगाडी शाैकिन आणि आयोजक यांच्यातील शाब्दीक वादावादीचे रूपांतर भांडणामध्ये झाले. शर्यती पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्याच्या कारणावरून हा राडा झाला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवारवाडी, (ता. फलटण) येथील जमीन गट नं. 57 मधील … Read more

आंबा, द्राक्ष बागा भुईसपाट : माण तालुक्याला अवकाळीने झोडपले, शेतकऱ्यांची पंचनामा करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर, शिरताव, वरकुटे- मलवडी परिसरात रात्री 10 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आबा बागायतदारांसह कारले, दोडका व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची … Read more

5 एकर शेत अन् 75 दिवस..शेतकऱ्याने कमावले तब्बल 13 लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील शेतकरी सागर पवार याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सागरने अवघ्या 75 दिवसात 5 एकर शेतीतून कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेऊन तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या तरुण शेतकऱ्याची सर्वत्र वाहवा होते आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील रहिवासी … Read more

PM Kisan मधील पैशांचे स्टेटस कसे तपासायचे ते जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । देशातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी ई-केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीएम किसानच्या वेबसाइटनुसार, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपडेट केले गेले आहे आणि त्याचे व्हेरिफिकेशन सरकारने पूर्ण केले आहे. त्यांचे स्टेट्स देखील अपडेट्स केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या स्टेट्स मध्ये FTO जनरेटेड असे … Read more

कराडला आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन : डाॅ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि कृष्णा कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून 22 डिसेंबर 2022 रोजी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करणार असल्याची माहिती कृष्णा सहकारी बॅंकेचे चेअरमन डाॅ. अतुल भोसले यांनी दिली. कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. … Read more

कृष्णा कृषी विकास परिषदेच्या अध्यक्षपदी अशोकराव थोरात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आपला देश कृषीप्रधान असून अर्थव्यवस्थेचा स्थिरपणा हा शेतीमुळे आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे, पाण्याचे नियोजन करणे यासह अॅग्रीकल्चरमध्ये टेक्नालाॅजी आणली पाहिजे यासाठी कृष्णा कृषी विकास परिषद व पाणी परिषदेचे स्थापना करण्यात आल्याची माहिती यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले यांनी केली. कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठ … Read more

किसनवीर कारखान्याच्या आखाड्यात आबा- काकांचा अवैध अर्ज वैध

सातारा | सातारा जिल्ह्यात पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यासाठी प्रचंड गदारोळानंतर आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आबा- काका या बंधूची जोडी असणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. किसनवीर सहकारी साखर कारखानासाठी 3 मे … Read more

देवेंद्र फडणवीसांचे ट्विट : जिहे- कटापूर प्रकल्पाला केंद्राकडून 247 कोटी मंजूर

सातारा | महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला म्हणजेच जिहे कठापूर योजना प्रधानमत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकल्पाला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस आणि माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी आभार … Read more

किसनवीर कारखाना निवडणूकीसाठी विक्रमी 347 अर्ज : आ. मकरंद आबा, नितीन काका व मदनदादा रिंगणात

सातारा | पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणार्‍या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 223 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण विक्रमी 347 अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, मदनदादा भोसले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. आ. महेश शिंदे यांच्या … Read more

PM KISAN: पुन्हा एकदा वाढवली मुदत, आता शेतकरी ‘या’ तारखेपर्यंत करू शकतील eKYC

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसीची शेवटची तारीख वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 होती, जी दोन दिवस आधीच 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. पीएम किसान योजनेअंतर्गत 12 कोटी 53 लाखांहून जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. नऊ … Read more