अजिंक्यतारा साखर कारखान्यांची निवडणूक बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्यांच्या संचालकांच्या 22 जागांसाठी 22 अर्ज शिल्लक राहिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करण्यात आले.

बिनविरोध संचालक मंडळ पुढीलप्रमाणे – गट क्रमांक 1 सातारा – शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले (सातारा), नामदेव विष्णू सावंत (चिंचणी), राजेंद्र भिकू घोरपडे (पोगरवाडी), गट क्रमांक 2 नागठाणे- मोहनराव नथुराम साळुंखे (बोरगाव), एकनाथ उर्फ सुनील दत्तात्रय निकम (अपशिंगे), यशवंत हरी साळुंखे (नागठाणे), गट क्रमांक 3 अतीत – शिवाजी रघुनाथ काळभोर (रामकृष्ण नगर), रामचंद्र रंगराव जगदाळे (नांदगाव), बजरंग श्रीरंग जाधव (खोडद), गट क्रमांक 4 चिंचणेर – विश्वास रामचंद्र शेडगे (अंगापूर -तारगाव), भास्कर एकनाथ घोरपडे गोजेगाव), विजयकुमार आनंदराव घोरपडे (खोजेवाडी), दत्तात्रय पांडुरंग शिंदे (सोनगाव -निंब- क्षेत्र माऊली), गट क्रमांक 5 गोवे – सर्जेराव दिनकर सावंत (लिंब), पांडुरंग आप्पाजी साबळे (शिवथर), नितीन भानुदास पाटील, उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी – शशिकांत यशवंत साळुंखे (वनगळ), महिला राखीव – विजया सतपाल फडतरे (जिहे), वनिता अशोक शेलार (म्हसवे), अनुसूचित जाती )जमाती राखीव – वसंत जगन्नाथ पवार (नागठाणे), वि.जा.भ.जा. वि.मा.प्र राखीव- अशोक रामचंद्र कुराडे (अतीत), इतर मागास प्रवर्ग राखीव – जयवंत रामचंद्र कुंभार (काशीळ).

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अजिंक्यतारा सहाकारी साखर कारखान्यात भाऊसाहेब महाराज असल्यापासून शिस्तीत कारखाना सुरू आहे. कारखान्याचे 22 हजार सभासद आहेत. तेव्हा शेतकरी संघटनेनेही सहकार्य करावे, अशी विनंती करतो.

चुकीच्या पध्दतीने अर्ज बाद केले : राजू शेळके

शेअर्सची रक्कम भरले नाहीत म्हणून थकबाकीदार दाखविले आहेत. आमचे अर्ज चुकीच्या पध्दतीने बाद केले आहेत. याबाबत साखर आयुक्ताकडे अपील करणार आहेत. शेतकऱ्याच्या हितासाठी निवडणूक लढणार आहे. अजिंक्यतारा कारखान्याकडून अनेक बाबीची अमंलबजावणी केली जात नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला आहे.

Leave a Comment