राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी २०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त … Read more

सुप्रिम कोर्टाच्या आडून कृषी कायदे शेतकर्‍यांच्या बोकांडी बसवण्याचा सरकारचा डाव? – राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय दिला. यांनंतर कृषी कायद्यांची पुनरस्थापना करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने एक समिती गठीत केली. मात्र या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणार्‍यांनाच स्थान दिल्याने शेतकरी वर्गात अंसंतोष दिसत आहे. यापार्श्वभुमीवर अंदानी, अंबाणीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती … Read more

म्हणुन तो बिबट्या NH4 हायवेवर बसून राहिला; कराड-नांदलापूर फाट्याजवळील घटना (Video)

Leopard

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाचवड फाटा (नांदलापूर) ता. कराड दरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गालगत बिबट्याने काही क्षण ठोकला. एवढ्या वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने महामार्गावर तळ ठोकल्याने वाहनधारकांचीही भंबेरी उडाली. बिबट्याने महामार्गावर काही क्षण विश्रांती घेतलयानंतर त्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान, महामार्गवर बसलेल्या बिबट्याचे काही वाहनधारकांनी केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी … Read more

कोरोनानंतर देशात आता ‘बर्ड फ्लू’चं संकट! ‘या’ राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट पूर्णपणे टळत नाही, तोच देशावर आणखी एका साथीचं संकट आलं आहे. कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’चं नवं संकट ओढावलं आहे. या राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप ‘बर्ड फ्लू’चं संकट नाही आहे. याशिवाय बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये … Read more

राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस? पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबई । राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. पण अचानक हवामानात बदल होऊन राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे … Read more

मध्य प्रदेशात खासगी कंपनीने लावला शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना; मोदींच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह

भोपाळ । मोदी सरकारच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं देशातील पहिलंच प्रकरण मध्य प्रदेशात समोर आलंय. खासगी कंपनीनं दिलेले चेक बाऊन्स झाले असून शेतकऱ्यांना तब्बल २ कोटींचा चुना लावत ट्रेडर्स फरार झाल्यानं फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवा प्रश्न उभा राहिलाय. (Fraud with MP Farmers) मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील एका कंपनीनं जवळपास दोन डझन शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट … Read more

Pm Kisan Scheme: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 2 हजार रुपये होणार जमा; पैसे आले कि नाही असं करा चेक!

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेचा सातवा हप्ता उद्या म्हणजेच 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या सातव्या हप्त्याद्वारे मोदी सरकार 25 डिसेंबरला सुमारे 18,000 कोटी रुपये देणार आहे. या योजनेत वर्षातून तीन वेळा 2 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आपल्या … Read more

दिल्लीतील पारा ४ अंशावर; मोदी सरकार ढिम्म! शेतकरी मागण्यांवर ठाम! आंदोलनाचा २१ वा दिवस

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात कोरोना संक्रमण काळातही गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसलाय. परंतु, इतके दिवस आंदोलन सुरु असताना मोदी सरकार ढिम्म असून कुठलाही तोडगा काढण्याची त्यांची तयारी दिसत नाही आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा २१ वा दिवस उजाडला असून दिल्लीतील पारा तब्बल ४ अंशावर आल्यावर अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा … Read more

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला राज्यात सकारात्मक प्रतिसाद; ‘या’ ५ मोठया बाजार समित्या राहणार बंद

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापा-यांचा मंगळवार 08 डिसेंबर रोजी संप असणार आहे. इतकंच नाही तर उद्या भारत बंदमध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे इथल्या 5 बाजार समित्या बंद असणार असून पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं … Read more

शेतकरी आंदोलनाचा वणवा: नवी मुंबई एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

नवी मुंबई । गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) वणवा आता देशभरात पसरला आहे. या पार्श्वभूमवीर मंगळवारी शेतकऱ्यांनी ”भारत बंद” आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय येथील … Read more