Pm Kisan: पंतप्रधान किसान निधीसंदर्भात काही अडचण आल्यास ‘या’ क्रमांकावर करा कॉल, त्वरित तोडगा निघू शकेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan Samman Nidhi) मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे आणि तरीही तुमचे पैसे आलेले नाहीत किंवा तुम्हाला काही अडचण आली असेल, तर आता तुम्हाला कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्र सरकारने त्यासाठी लँडलाईन नंबर आणि मेल आयडी जारी केले आहेत, या नंबरवर कॉल करून आपण आपली समस्या सोडवू शकता.

आता आपण थेट कृषी मंत्रालया (Ministry of Agriculture) कडे देखील याबाबत तक्रार करू शकता. केंद्र सरकारने सुरू केलेली शेतकर्‍यांशी संबंधितील ही सर्वात मोठी योजना आहे आणि हे पैसे सर्व शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पोहचलेच पाहिजेत असा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी सरकार अनेक नवीन प्रयत्न करत असते.

2000 रुपये मिळवण्यासाठी येथे तक्रार करा, त्वरित तोडगा काढला जाईल
पहिल्यांदा आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हि लोकंआपले म्हणणे ऐकत नसतील तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता. सोमवार ते शुक्रवार या काळात पंतप्रधान-किसान हेल्प डेस्कच्या (PM-KISAN Help Desk) ईमेल (Email) [email protected] वर संपर्क साधता येईल. तेथूनही काही फरक पडत नसेल तर या सेल फोन नंबर 011-23381092 (Direct HelpLine) वर कॉल करा.

मंत्रालयाशी संपर्क साधण्याचीही सुविधा आहे
केंद्र सरकारची सर्वात मोठी शेतकरी योजना आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. यात एक हेल्पलाईन नंबर आहे. ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.

>> पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
>> पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261
>> पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401
>> पंतप्रधान किसान यांची नवीन हेल्पलाईन: 011-24300606
>> पंतप्रधान किसान यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109
>> ईमेल आयडी: [email protected]

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment