अहमदाबाद: वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर गरबाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसत आहेत. ठीक ठिकाणी गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अशाच एका गरबा कार्यक्रमात दोन तरुणांना (youth beaten) मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अहमदाबादच्या गरबा कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. पीडित तरुण हे मुस्लिम (youth beaten) असल्याचे बोलले जात आहे. या तरुणांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
अहमदाबादच्या गरबा उत्सवात शिरलेल्या दोघा तरुणांना मारहाण ; Video आला समोर pic.twitter.com/8M0yVBp4j4
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 29, 2022
हे तरुण वाईट उद्देशाने या गरबा कार्यक्रमात शिरल्याचा दावा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या संशयास्पद तरुणांना (youth beaten) या कार्यकर्त्यांनी चक्क कार्यक्रमात येऊन इतका चोप दिला आहे की, आपण व्हिडिओत पाहू शकतो हे दोन तरुण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या कार्यकर्त्यांकडे गयावया करताना दिसत आहेत. या मारहाणीत या तरुणांचे कपडे देखील फाडण्यात आल्याचे आपण पाहू शकता.
अहमदाबादच्या एसपी रिंग रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या गरबा कार्यक्रमात (youth beaten) हा संपूर्ण प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या संपूर्ण घटनेनंतर अद्याप कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर