अकोले मध्ये भाजपला मोठा धक्का

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आज अजित पवार यांच्या सभेमध्ये आणि उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मधुकर पिचड यांच्या विरोधात ‘एकास एक लढत’ देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली असून लहामटे आणि भांगरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे त्यांना मोठे बळ मिळाले आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या अनेकांच्या काही चुका झालेल्या आहेत. त्या झाकण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले आहे. सहकारी संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नाहीत याचे भानही अनेकांना राहिले नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अकोले येथील सभेत केली. त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पिचड पिता-पुत्रांकडे होता.

ते पुढे म्हणाले,’स्थानिकांचा विरोध डावलून आम्ही पिचड पिता-पुत्रांना पक्षात मानाचे स्थान दिले. राज्यातील आणि सहकारी संस्थांमधील महत्वाची पदे दिली. तरीही त्यांनी पवारांचा विश्वासघात केला. त्यांच्या ताब्यातील साखर कारखाना असो की इतर संस्था, तेथे काय चालते याची माहिती आहे. संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नाहीत, याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या चुका झाकण्यासाठी राजे, नेते, सेनापती सोडून गेले आहेत. त्यांना जाऊ द्या, आता नवीन पिढी आणि महिलांना संधी देण्यात येत आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे दाखवून देण्यासाठी अशा लोकांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे.’