हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील (AIIMS Hospital)आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही आग कशी लागली याचे देखील कारण उघडकीस आलेले नाही.
एम्स रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. सध्या आपत्कालीन वॉर्डजवळ असलेल्या सर्व विभागातील रुग्णालयांना ताबडतोब बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर अग्निशामक दलाच्या 6 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबतची माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.
#WATCH | Delhi: A fire broke out in the endoscopy room of AIIMS. All people evacuated.
More than 6 fire tenders sent, say Delhi Fire Service
Further details are awaited. pic.twitter.com/u8iomkvEpX
— ANI (@ANI) August 7, 2023
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, एम्स रुग्णालयातील दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सर्व रुग्णांना सुरक्षितरित्या रुग्णालयाच्या बाहेर आणले गेले आहे. तर अग्निशामक दलाने देखील आग नियंत्रणात आणली आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पाहिला मिळाल्यामुळे रु्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरुन गेले होते. मात्र थोड्याच वेळात बचाव पथकाने या सर्वांना बाहेर काढले आहे. त्यामुळे सर्व रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक सुखरुप आहेत.
दरम्यान, एम्स रुग्णालय देशभरात नावाजलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज १२ हजार पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच या ठिकाणी अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया पार पडतात. एम्स रुग्णालयलात सर्व सामान्य जनतेपासून ते मोठ मोठे व्यक्ती उपचारासाठी येत असतात. आज याच रुग्णालयाला आग लागल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली होती.