नवी दिल्ली । कर्जबाजारी झालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला विकण्याचा सरकारचा प्रयत्न अखेर यशस्वी झाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर एअर इंडियाची कमांड टाटा समूहाकडे सोपवण्यात आली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूहाने सुमारे 18 हजार कोटींची बोली लावली होती. DIPAM सचिव आणि सिविल एविएशन मिनिस्ट्री मंत्रालयाच्या सचिवांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
निवेदनात म्हटले आहे की,”एअर इंडियाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला एका वर्षासाठी काढून टाकले जाणार नाही. 12485 कर्मचारी आहेत, 8085 कायम, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये 1485 कर्मचारी आहेत. त्यानंतर VRS देता येईल. मात्र त्यासाठी ग्रॅच्युइटी आणि सर्व नियमांचे पालन करावे लागेल.
एअर इंडियाला दररोज होते आहे 20 कोटींचे नुकसान
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की,” एअर इंडियाला दररोज 20 कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. या अधिग्रहणानंतर, हे नुकसान करदात्यांना भरावे लागणार नाही.”
एअर इंडिया ब्रँडचा पाच वर्षांसाठी वापर
एअर इंडिया ब्रँड पाच वर्षांसाठी वापरता येईल. त्यानंतर ते खरेदीदाराकडून भारतीय व्यक्तीलाच विकता येईल. 100% शेअर्स ट्रान्सफर केले जात आहेत मात्रया कराराच्या काही अटी देखील आहेत ज्याचे पालन करावे लागेल.
जेआरडी टाटा यांचा फोटो शेअर करत रतन म्हणाले – वेलकम बॅक
रतन टाटा यांनी जेआरडी टाटांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले – वेलकम बॅक. टाटाने एअर इंडियासाठी 18,000 कोटींची बोली लावली होती. त्यांनी एक नोट शेअर केली आहे ज्यात लिहिले आहे – टाटा ग्रुपने एअर इंडियाची बोली जिंकल्याची बातमी खूप आनंद देणारी आहे. एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. अशी अपेक्षा आहे की, यामुळे विमान क्षेत्रातील टाटा समूहाची उपस्थिती आणखी मजबूत होईल. जेआरडी टाटा यांची आठवण काढताना त्यांनी लिहिले -“जर ते आज असते तर त्यांना हा क्षण पाहून खूप आनंद झाला असता.”