धक्कादायक! कोझिकोड विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांपैकी दोघे कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोझिकोड ।  दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १८ प्रवाशांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, जखमींच्या नातेवाईकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात मरण पावलेल्या १८ प्रवाशांपैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर विमान अपघातानंतर मदत कार्यात असलेल्या सर्वांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

असा घडला विमान अपघात
दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचं A737 बोईंग विमान संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास धावपट्टीवर उतरताना घसरले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३५ फुटी खड्यात जाऊन कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) निवेदनाद्वारे दिली. विमान उतरताना त्यात आग लागली नव्हती, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने स्पष्ट केले. या विमानामध्ये १७४ प्रवासी, १० लहान मुलं, २ पायलट आणि ५ केबिन क्रू एवढे जण होते, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली. याशिवाय या विमान दुर्घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अँक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”