हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना फिरायला जायची लगभग सुरु होते. त्यानुसार पालक देखील सुट्यांसाठी रजा टाकून नेमकं जायचं कुठे हा प्लॅन करत असतात. याचबरोबर अजून एक गोष्टीची तयारी सुरु होते ती म्हणजे प्रवासाची. किंवा प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या बसेस कार किंवा विमानसेवेची. जर तुम्ही देखील कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. एअर इंडिया ने या उन्हाळी सुटटींचा विचार करून खास विमानसेवा सुरु केलेली आहे. ही नॉन स्टॉप सेवा असणार आहे. आणि या प्रवासासाठी बम्पर सूटही देण्यात आली आहे.
एअर इंडिया ने उन्हाळी सुट्टी घालवताना प्रवाशांची धावपळ होऊ नये आणि प्रवास सुखरूप व्हावा यासाठी एक नव्हे तर 10 शहरांसाठी विमानसेवा सुरु केलेली आहे. ही एक नॉन-स्टॉप डायरेक्ट फ्लाइट असणार आहे. त्यानुसार, मुंबई वरून राजकोट, वडोदरा, अमृतसर या सोबतच आणखी 10 शहरांत तुम्ही नॉन स्टॉप जाऊ शकता. तुम्ही देखील अशा फ्लाईटने देशांतर्गत कोठेही जाऊ इच्छित असाल तर तुम्ही एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट पोर्टलला भेट देऊन प्रवासी तिकीट बुक करू शकतात.
जर तुम्ही मुंबई वरून गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी चार नॉनस्टॉप विमानसेवा उपलब्ध आहे . मुंबई ते जयपूरसाठी दररोज दोन नॉन स्टॉप उड्डाणे, मुंबई ते नागपूर दररोज तीन, मुंबई ते अमृतसर दररोज एक, मुंबई ते मंगलोर साठी दोन, मुंबई ते राजकोट दररोज दोन , मुंबई ते वडोदरा दररोज दोन नॉन स्टॉप फ्लाईट असणार आहे. यासोबतच कोची साठी रोज चार, कोयंबटूर साठी रोज एक आणि अहमदाबाद साठी रोज दोन, नॉन स्टॉप फ्लाईट्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.
तिकिटावर 10 टक्के सूट –
एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट पोर्टलवरून फ्लाइट तिकीट बुक केल्यावर तुम्हाला 10 टक्के सूट मिळणार आहे. यासोबतच तुम्ही मोबाईल अँप वरून तिकीट बुक केले, तर 10 टक्के सूट देखील दिली जाणार आहे. अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही एअर इंडियाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.