हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Air India एअरलाईन्सचे जानेवारी 2022 मध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून भारत सरकारकडून अधिग्रहण करण्यात आले. त्यानंतर एअर इंडिया एअरलाईन्सचे रुपडे बदलून नवीन रूपात एअर इंडिया एअरलाईन्स जनसेवेत येईल अशी घोषणा करण्यात आली. यानंतर आता नवीन एअरबस A320neo नवी दिल्लीत पोहोचले असून लवकरच एअर इंडियाच्या ताफ्यात जॉईन होईल.
Air India ने Airbus A320neo विमानाची छायाचित्र X. Com वरील अकाउंटच्या माध्यमातून प्रकाशित केली आहेत. यावेळी एअर इंडियाने म्हंटल कि, आमच्या नवीन एअरबस A320neo, VT-RTF ची एक झलक आहे, जी आज दिल्लीत दाखल झाली आहे. आम्ही तुमचे स्वागत करण्यासाठी आणि वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आता अजून स्वतःला रोखू शकत नाही. एअर इंडियाने यापूर्वी A350 विमानाचे फोटो सुद्धा असच शेअर केले होते. हे विमान फ्रान्समधील टूलूस येथील एअर इंडियाच्या कार्यशाळेतील आहेत.
Here’s a sneak peek of VT-RTF, our latest Airbus A320neo, which arrived in Delhi earlier today. We can’t wait to welcome you on board and experience the ambience!#FlyAI #AirIndia #NewFleet #A320Neo pic.twitter.com/5pyhPXHrJs
— Air India (@airindia) October 12, 2023
400 मिलियन डॉलर इतका खर्च
कंपनीने Air India च्या फ्लिटमध्ये असलेल्या सर्व विमानांचे डागडुजी व रंगारंगोटी करण्यासाठी 400 मिलियन डॉलर इतका खर्च करण्यात येणार आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात एअर इंडियाला स्थान बळकट करण्यासाठी व एअर इंडियाच्या प्रवाश्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी कंपनी एव्हडा खर्च करत असल्याचे सांगत आहे.
Air India ने तब्बल 70 बिलियनची दिली ऑर्डर
एअर इंडियाने आपल्या फ्लिट मधील विमानांची संख्या वाढवण्यासाठी जून महिन्यात विमान खरेदीसाठीची बलाढ्य अशी ऑर्डर कंपनीने विमान बांधणी करणाऱ्या बॉईन्ग आणि एअरबस या कंपन्यांना दिली होती. एअर इंडियाने दिलेली ऑर्डर तब्बल 70 बिलियन असून यामध्ये 250 एअरबस आणि 220 बॉईन्ग कंपनीचे विमान मागवण्यात आले आहेत. या दिलेल्या ऑर्डरनुसार पहिले विमान नव दिल्ली येथे हजर झाले आहे. A320neo हे नवेकोरे विमान दिल्ली येथील विमानतळावर दाखल झाले आहे. लवकरच हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल करण्यात येईल अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.