Google सोबतच्या भागीदारीबाबत Airtel चे स्पष्टीकरण; म्हणाले की, आमचा स्मार्टफोन आणण्याचा ……

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Airtel चा Google सोबत स्मार्टफोन बनवण्याचा कोणताही प्लॅन नसला तरी, ते त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून युझर्समध्ये स्मार्टफोनचा वापर वाढविण्याच्या दिशेने काम करतील. ज्यामुळे सरासरी महसूलावर युनिट- ARPU वाढेल.”असे स्पष्टीकरण Bharti Airtel चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी दिले आहे.

ते पुढे म्हणाले की,” ते ARPU वर जोर देत राहतील कारण आम्हाला हे देखील माहित आहे की, प्रत्येक स्मार्टफोन युझरमुळे ARPU मध्ये लक्षणीय वाढ होते, जो आमच्या अजेंड्याचा भाग आहे.” ते पुढे म्हणाले की,”ARPU ची पातळी 200 रुपयांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. आणि दीर्घ मुदतीसाठी, ते 300 रुपयांपर्यंत घ्यावे लागेल. सध्या ते 153 च्या पातळीवर आहे.”

“आमचे स्वतःचे उपकरण (स्मार्टफोन) बनवण्याचे कोणतेही प्लॅनिंग नाही, मात्र फीचर फोनमधून स्मार्टचा वापर करण्यास गती देण्यासाठी इकोसिस्टममध्ये भागीदार होण्याची आमची योजना आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की,” स्मार्टफोन आणखी परवडणारे बनवणे हा व्यवसायातील प्रमुख उपक्रमांपैकी एक असेल.”

विठ्ठल म्हणाले की,”आम्ही नेहमीच म्हंटले आहे की,आमचा सबसिडीकडे कल नसून आम्ही बाजारात स्पर्धात्मक राहणार आहोत, त्यामुळे जिथे जिथे प्रोत्साहन द्यावे लागेल, त्या आधारे आम्ही सॉफ्टवेअरची क्षमता विकसित केली आहे. जेणेकरून खरे तर तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आम्ही आणखी स्मार्ट होऊ आणि आर्थिक खर्च कमी करू.”

Google-Airtel भागीदारी
शुक्रवारी जागतिक टेक कंपनी Google आणि दिग्गज भारतीय टेलिकॉम सर्व्हिस भारती एअरटेल यांनी धोरणात्मक भागीदारी अंतर्गत हातमिळवणी केली. या भागीदारीअंतर्गत Google आता एअरटेलमधील 1.28 टक्के हिस्सा खरेदी करेल. Google ने म्हटले आहे की,” ते भारती एअरटेलमध्ये $ 1 बिलियन किंवा सुमारे 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. Google ही गुंतवणूक Google फॉर इंडिया डिजिटायझेशन फंडाचा भाग म्हणून करत आहे.”

BSE ला दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेलने स्पष्ट केले आहे की, Google कंपनीतील हा स्टेक 734 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करेल. Google परवडणारे फोन विकसित करण्यासाठी Bharti Airtel सोबत काम करेल आणि $70 कोटीं मध्ये 5G तंत्रज्ञानावर रिसर्च करेल. उर्वरित $30 कोटी एक व्यावसायिक करार म्हणून वापरला जाईल

Leave a Comment