हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एअरटेल (Airtel) ने नुकताच एक प्लॅन लॉन्च केला असून ज्यात नेटफ्लिक्स (Netflix) सबस्क्रिप्शन मोफत दिले. Netflix ने या आधीच निवडक Airtel प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन प्रदान केले गेले आहेत, परंतु आता कंपनीने ब्रॉडबँड प्लॅनसह नेटफ्लिक्सची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. Airtel ने एक प्लॅन लॉन्च केला असून त्याद्वारे ग्राहकांना मनसोक्तपणे चित्रपट व वेब सिरीज मोफतपणे पहायला मिळणार आहे. जाणून घेऊया काय आहे प्लॅन…
काय आहे Airtel प्रोफेशनल प्लॅनची किंमत? (Airtel)
एअरटेल (Airtel) प्रोफेशनल प्लॅनची किंमत 1,498 रुपये प्रति महिना अशी आहे. त्याच जागी इन्फिनिटी (Infinity) प्लॅन 3,999 रुपये प्रति महिना आहे. प्रोफेशनल प्लान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 199 रुपये मधला नेटफ्लिक्सला बेसिक प्लान अगदी मोफत मिळणार आहे. आज जे हा प्लॅन निवडतील त्यांना नेटफ्लिक्सचा प्रीमियम प्लॅन महिन्याकाठी सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ज्याची किंमत 649 रुपये आहे. भारतात Netflix चार प्लॅन ऑफर करते, ज्यात मोबाइल प्लॅन, बेसिक प्लॅन, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन यांचा समावेश आहे.
Netflix प्लॅनची अशी आहे किंमत?
मोबाईल प्लॅन 149 रुपये प्रति महिना असून सोबत एक स्क्रीन सपोर्ट आहे. शिवाय 199 रुपयांचा देखील प्लॅन आहे जो फोन आणि सोबत टीव्ही आणि कंप्युटरवर देखील चालू शकतो. 499 रुपयांचा प्लॅन देखील आणि 649 रुपयेचा प्रीमियम प्लॅन आहे. या सर्व प्लॅनमध्ये प्रामुख्याने 2 आणि 4 स्क्रीनचे सपोर्ट देण्यात आलेले आहेत.
Airtel ब्रॉडबँड प्लॅन्सवर Netflix एक्टिव करण्यासाठी अशा करा फॉलो स्टेप –
Step 1: एअरटेल थैंक्स अॅप वर डिस्कव्हर थँक्स बेनिफिट पेज वर जा
Step 2: खाली स्क्रॉल करा आणि ‘Netflix‘ या विभागातील तुमच्या पुरस्कारांचा आनंद घ्या.
Step 3: निवडीचा दावा करा.
Step 4: Netflix प्रोडक्ट पेज वर पुढे जा पर्याय वर क्लिक करा.
Step 5: नेटफ्लिक्सच्या वेबसाइटवर ग्राहकांना एकीकरण पूर्ण करण्यासाठी रिडायरेक्ट केले जाईल.
हे पण वाचा –
Airtel ने 1.17 लाख कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीचा प्लॅन बनवला, जाणून घ्या तुम्हाला काय फायदा होईल
Netflix ची नवीन ग्राहकांसाठी ; खास ऑफर; बेसिक आणि स्टॅण्डर्ड प्लॅन होणार मोफत अपग्रेड