Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel कडून आपल्या युझर्सना काही चांगले पोस्टपेड प्लॅन ऑफर केले जातात. एअरटेलकडून नेहमीच मोबाइल सेवांच्या दरवाढीबाबत आवाज उठवला जातो. आतापर्यंत या कंपनीने फक्त आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरातच वाढ केली होती मात्र आता ते पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीही वाढवणार आहेत.

Airtel ने नुकताच एक नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच केला होता, ज्यामध्ये जुनेच फायदे नवीन किंमतीत दिले जात आहेत. वास्तविक, Airtel ने आपला 999 रुपयांच्या प्लॅनची किंमत बदलून 1199 रुपये केली आहे.

Airtel Postpaid Plans, Unlimited Data Plans, Calls & More

Airtel चा 1199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

एअरटेलकडून आपल्या युझर्सना 200GB पर्यंतच्या रोलओव्हरसह प्रत्येक ऍड -ऑन कनेक्शनसाठी 150GB मंथली डेटा + 30GB ऍड -ऑन डेटा ऑफर दिली जाते. या प्लॅनमध्ये युझर्सना कुटुंबातील सदस्यांसाठी रेग्युलर व्हॉइस कनेक्शनसाठी दोन फ्री ऍड -ऑन मिळवता येतील. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100एसएमएस/दिवस देखील मिळतात.

या प्लॅनसह ऑफर केलेल्या एअरटेलथँक्स प्लॅटिनम रिवॉर्ड्समध्ये मंथली नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन, कोणत्याही अतिरिक्त पेमेंटशिवाय सहा महिन्यांची Amazon प्राइम मेंबरशिप आणि डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल प्लॅन, विंक प्रीमियम समाविष्ट आहे. इथे हे लक्षात घ्या की, याआधी हे सर्व फायदे कंपनीच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळायचे.

Airtel Postpaid Plans Popular Than Reliance Jio; Adds 0.7 Million Customers  In December - Gizbot News

एअरटेल 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन मध्ये आपल्याला 100GB डेटा (प्रत्येक ऍड -ऑन कनेक्शनसाठी 30GB), 200GB पर्यंत रोलओव्हरसह 100GB मंथली डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवस मिळतील. याशिवाय Airtel Thanks Platinum चे फायदेही दिले जातील. याबरोबरच यामध्ये एकूण दोन ऍड-ऑन कनेक्शन देखील मिळतील. 999 रुपयांचा प्लॅन हा अजूनही चांगला पर्याय ठरू शकेल.

Airtel's best prepaid plans for tariff

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/myplan-infinity/

हे पण वाचा : 

Aadhaar Card Update : मोबाईल नंबरशिवाय PVC आधार कार्ड कसे तयार करावे हे जाणून घ्या

PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

EPF account मध्ये आपले बँक डिटेल्स कसे अपडेट करायचे ते समजून घ्या

FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Vehicle Parking Rule :’आता रस्त्यावर पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार 500 रुपयांचे बक्षीस’, नितीन गडकरी काय म्हणाले ते पहा

Leave a Comment