हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel : काही महिन्यांपूर्वी Jio कडून देशात 5G सर्व्हिस सुरु करण्यात आली. यावेळी जिओने ग्राहकांसाठी 5G वेलकम ऑफर लाँच केली. ज्याला टक्कर देण्यासाठी Airtel ने देशभरातील आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केला आहे. या दोन्ही कंपन्यांकडून देशभरातील प्रमुख महानगरे आणि शहरांमध्ये आपल्या 5G नेटवर्कचा वेगाने विस्तार केला जातो आहे. मात्र या कंपन्यांनी अजूनही डेडिकेटेड 5G रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले नाहीत. सध्या ते 4G रिचार्ज प्लॅनवरच 5G डेटा ऑफर करत आहेत. Jio कडून ‘वेलकम ऑफर’ अंतर्गत अनलिमिटेड 5G मोबाइल डेटाची ऑफर दिली जाते आहे, तर एयरटेल ने देखील कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्वतःची अनलिमिटेड 5G डेटा ऑफर लाँच केली आहे. चला तर त्याविषयीची माहिती घेउयात…
Airtel ची अनलिमिटेड 5G डेटा ऑफर जाणून घ्या
एयरटेलने आपल्या ग्राहकांसाठी फ्री मध्ये अनलिमिटेड 5G डेटा ऑफर दिली जाते आहे. यासाठी ग्राहकांना Android आणि iOS वरील Airtel Thanks App द्वारे क्लेम करता येईल.
Airtel या ऑफरचा लाभ कोणाकोणाला घेता येईल ???
ही ऑफर 239 रुपयांपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही अनलिमिटेड प्लॅनद्वारे रिचार्ज करणाऱ्या सर्व प्रीपेड ग्राहकांना लागू असेल. तसेच सर्व पोस्टपेड ग्राहकांसाठी देखील ती उपलब्ध असेल.
ग्राहकांना Airtel Thanks App वर जाऊन होम स्क्रीनवर “Claim Unlimited 5G data”असे लिहिलेला बॅनर दिसेल.
या बॅनरवर टॅप केल्यानंतर, “unlimited 5G data” असे लिहिलेले दिसेल जो पूर्णपणे मोफत असेल. आता Claim Now या बटणावर क्लिक करा.
यानंतर, मोबाईल नंबरवर Unlimited 5G data आता ऍक्टिव्ह झाला आहे, असा एक कंफर्मेशन मेसेज मिळेल.
मात्र इथे हे लक्षात घ्या की, ज्या भागात Airtel 5G उपलब्ध आहे त्याच भागात आवश्यक OTA अपडेटसहीत 5G-एनेबल्ड फोनवर ही ऑफर लागू आहे. त्यासाठी ग्राहकांना 239 रुपयांचे किमान रिचार्ज (अनलिमिटेड प्लॅन) करावे लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/5g-network/
हे पण वाचा :
Bank FD : खुशखबर !!! ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडीवर देत आहे 9.50% व्याजदर
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळतील 7 लाख रुपये
Success Story : शालेय शिक्षण अर्धवटच सोडणारा ‘हा’ व्यक्ती बनला अब्जाधीश; स्थापन केली 16,500 कोटींची कंपनी
New Business Idea : ‘या’ तंत्रज्ञानाद्वारे घराच्या छतावरच भाजीपाल्याची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न