21.24 लाख टॅक्सपेयर्स ना जाहीर झाला 71 हजार 229 कोटी रुपयांचा रिफंड, ‘असा’ तपासा आपला स्टेटस 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने ८ एप्रिल पासून ११ जुलै च्या मध्ये २१.२४ लाख करदात्यांना ७१,२२९ कोटी रिफंड जाहीर केला आहे. यामध्ये २४,६०३ कोटी रुपये हे वैयक्तिक करदात्यांसाठी जाहीर करण्यात आले आहेत जे १९.७९ लाख लोक आहेत. तसेच कंपनी कर अंतर्गत १.४५ लाख करदात्यांना ४६,६२६ कोटी रुपये परत देण्यात आले आहेत. एका विधानात रिफंडशी संबंधित जी प्रकरणे आहेत त्यांना प्राथमिक पातळीवर घेतले असून ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत त्यांना पूर्ण करण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

या विधानानुसार सरकार करदात्यांना कोणत्याही समस्येशिवाय कर संबंधित सेवा देण्यावर जोर देत आहे. सरकारला ही माहिती आहे की, कोविड-१९ दरम्यान या कठीण काळात बरेच टॅक्सपेयर्स या गोष्टीची वाट बघत होते की त्यांचे रिफंड प्रकरण लवकर सोडवावे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) यांनी करदात्यांना त्यांच्या परताव्याच्या वेगवान प्रक्रियेसंदर्भात विभागाच्या ई-मेलवर त्वरित उत्तर देण्यास सांगितले आहे. याद्वारे विभाग त्यांच्या परताव्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी पावले उचलेल.

कुणीही टॅक्सपेयर आपल्या आयटीआर प्रोसेसिंग चा स्टेटस इनकम टॅक्स ई फायलिंग वेबसाईट वर लॉग इन करून चेक करू शकतो. या पोर्टल वर लॉग इन करून आपल्याला डॅशबोर्ड मध्ये जाऊन View return/forms वर क्लिक करावे लागेल. यात  “Income tax returns” निवडून सबमिट वर क्लिक करावे लागेल. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ज्या वर्षाची रिटर्न फाईल केला आहे, त्या वर्षाच्या  “Acknowledgement Number”वर क्लिक करायचे आहे. मग आपल्याला समजेल आपल्या आयटीआर रिटर्न चा स्टेटस काय आहे.

हे पण वाचा –

कोरोना काळात मासिक 55 रुपये जमा केल्यावर दरमहा मिळतील 3 हजार; कसे ते जाणून घ्या

आता तुमच्या गाडीमध्ये बसविली जाईल हिरव्या रंगाची नंबर प्लेट , पिवळ्या रंगात लिहावा लागेल Number, सरकारचा निर्णय

गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम 

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

SBI शेतकऱ्यांना देते विशेष कर्ज, केवळ ४% आहे व्याजदर; जाणून घ्या सर्वकाही

Leave a Comment