हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून राजधानी दिल्ली मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत भयंकर वाढ झाली असून महाराष्ट्रातही कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दुसऱ्या लाटेची जरी शक्यता असली तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी, घाबरुन जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले.
“पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जातीये. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका, काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.मागील काही दिवसांत अनेक निष्पाप लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आपण जम्बो कोविड हॉस्पिटल उभारले आहे. आरोग्य यंत्रणेनेही चांगलं काम केलंय. त्यांनाही पुणेकरांनी सहकार्य करावं”, असं अजित पवार म्हणाले.
जनसंपर्क अधिक असलेले व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडरमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांनी आता ज्यादा काळजी घेणं उचित आहे. आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संकट टाळायचं आहे”, असंही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’