शरद पवार खोटं बोलत आहेत; मुख्यमंत्रीपदाबाबत अजितदादांचा वेगळाच दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| “2004 साली मी नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारले होते” असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्यं अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळून लावले आहे. “शरद पवार धादंत खोटं बोलत आहेत, 2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं” असं अजित पवार यांनी सांगितले आहे. यासह “1991 साली पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, परंतु सुधाकरराव नाईक शरद पवारांचं ऐकत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत अशी भीती पवारांना होती” असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

अजित पवार नेमके काय म्हणाले??

शरद पवार यांनी केलेले वक्तव्य फेटाळून लावताना अजित पवार म्हणाले की, “शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपण 2004 साली मुख्यमंत्र्यांची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की, आपलं यापूर्वीही कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोणी ऐकणार नाही.”

शरद पवारांचे वक्तव्यं

एका मुलाखतीत शरद पवारांनी सांगितले होते की, “2004 मध्ये मुख्यमंत्री पदाबाबत फार विचापूर्वक निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण, ते फारच नवखे होते.मुख्यमंत्रिपदासाठी कोणी योग्य उमेदवार आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदा सोपविले असते, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यामुळे अधिकची मंत्रिपदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो. मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेद केला नाही. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही, ही अजित पवार यांची ओरळ निरर्थक आहे”