अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही; अजित पवारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली

अजित पवार म्हणाले, केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्यायाची परंपरा कायम राहिली. आपण सार्वधिक जीएसटी आणि टॅक्स आपण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला निधी मिळावा अशी आमची अपेक्षा होती मात्र केंद्राकडून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे असे अजित पवार यांनी म्हंटल. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही त्यामुळे महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प”, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. या महिन्यात देशात उत्तर प्रदेश, पंजाबसह एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केला असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment