हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवारांच्या नावाचा आग्रह केला होता अखेर आज अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे.
सध्या महाविकास आघाडीच्या आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे निश्चित होते. पण दिग्गज नेतेमंडळींची फौज असलेल्या राष्ट्रवादीमधून नक्की कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर अजित पवार यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडली.
विरोधी पक्षनेता हा खरंतर ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखला जातो. अजित पवार याना राजकारणाचा आणि सभागृहाचा दांडगा अनुभव आहे. एक आक्रमक नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. भाजप आणि शिंदे गटा सारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असताना अजित पवारांसारखा आक्रमक नेता समोर असण गरजेचं होतं . अजित पवार हे आपल्या कडक शिस्ती साठी आणि स्पष्ट वक्तेपणा साठी ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीची जाण आणि अभ्यास आहे. त्यामुळे त्यांचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला होईल