कराडच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की,

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड येथील प्रशासकीय इमारत इमारतीचा लोकार्पण सोहळा व इतर कार्यक्रमांचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यलत केली आहे. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मला कराडमधील कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले कळले नाही. निमंत्रण नव्हते तर मी कसे जाणार. जाऊ द्या, ठीक आहे कळत शेवटी कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचे ते, असे पवार यांनी म्हंटले.

पुणे येथे अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कराड येथील कार्यक्रमाचे मला निमंत्रण होते कि नाही याची मला माहिती नव्हती. त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह करत असताना मी देखील बराच प्रयत्न केला होता. आम्ही काय उपकार केलेले नाहीत.

शेवटी लोकांची काम करणे हे प्रत्येकाचे काम असते. परंतु त्याच्यामध्ये मी स्वतः बऱ्याच काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप चांगले असे गेस्ट हाऊस आहे. परंतु मला कालपर्यंत तरी माहिती नव्हते कि, मला निमंत्रण आहे कि नाही. शेवटी बाकीचेही खूप प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.