पुणे प्रतिनिधी | अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून वाद निर्माण झाला होता. अहमदनराची ची जागा राष्ट्रवादीने सोडायला नकार दिला होता. राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी यासाठी काँग्रेसचे सुजय विखे पाटील यांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुजय विखेंना राष्ट्रवादीने नगरची ऑफर दिली होती, असा खुलासा अजित पवार यांनी केला.
सुजयने राष्ट्रवादी तिकीटावर लढावे, असे स्वतः अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र सुजयने याला नकार दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सुजय यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी स्विकारायला तयार होतो, असेही अजित पवार म्हणाले. मात्र, सुजय विखे यांनीच राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव ठोकरुन दिला.
सुजयला माझ्यासमोर आणा. हे जर खोटे असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे, असे थेट आव्हान अजित पवार त्यांनी दिले. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, की अजित पवार बोलतात ते खरंच बोलतात, असे अजित पवार यांनी आज मीडियाशी बोलताना बारामतीत सांगितले. राष्ट्रवादी – काँग्रेसला सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीला निश्चितपणे चांगल्या जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.
इतर महत्वाचे –
पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वंचित बहुजन आघाडी कडुन पुण्यातून उमेद्वारी बदलून यांना दिली..
पार्थ पवार या मतदार संघातून लोकसभा लढणार, राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर