सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आमच्या काळात सरकारने महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांना पद देण्याचे क्रांतिकारी निर्णय घेतले. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला. मात्र, आजच्या सरकारमधील दोन शहाण्यांना एका महिलेला मंत्री करु वाटत नाही, ही या सरकारची शोकांतिका आहे. ६ महिने झालं तरी एक महिला मिळत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तर वाटलं आपण दोघच राज्याला पुरुन उरु, असं कोणी पुरुन उरत नाही, असा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
सातारा येथील धामणेर येथे ग्रामपंचायत इमारत तसेच विकास सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीचे अजित पवारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, एका आमदारानं तर स्वत:चं ज्ञान पाझळवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं म्हटल आहे. महापुरुषांबाबत हे सर्व करत असलेली वक्तव्य प्रकार राज्याचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे.
सध्या इतिहासाची मोडतोड सुरु असून छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबसाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्याबाबत काहीही वक्तव्य करणं सुरु असून एका आमदारानं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं सांगितलं. आपण आमदार आहात थोडी माहिती घेऊन बोलत जा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
सरकारमधील दोघांना राज्याला पुरुन ऊरु असं वाटतंय, मात्र असं होत; अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना टोला pic.twitter.com/w6hBEu2aHZ
— santosh gurav (@santosh29590931) January 29, 2023
सोप्यावरून अजित पवार झाले नाराज
धामनेर येथील कार्यक्रमात विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते खासदार श्रीनिवास पाटील, रामराजे नाईक निबांळकर, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित राहिले होते. यावेळी व्यासपीठावर ठेवलेला सोफा पाहुन अजित पवार नाराज झाले. त्यांनी अचानक आवाज चढवून त्यांनी हा ठेवलेला सोफा काढायला लावला आणि सर्वासाठी ठेवलेल्या सोफ्यापैकी एक लावण्यास सांगितलं.