हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनात राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांना जास्त संख्येने लोकांनी हजेरी लावू नये, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी गर्दी करू नये, अशा सूचना केलेल्या आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उद्धघाटन कार्यक्रम पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे पहायला मिळाले.
कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशात प्रशासनाकडून कोरोना रुग्ण वाढणाऱ्या शहरात कठोर निर्बंध लादले जात आहेत. राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्यातील कोरोना परिस्थितीचा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांच्या हस्ते राष्टवादी काँग्रेस कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. गर्दी केल्यास कारवाईही करण्याचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे पहायला मिळाले.