अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली राज्यात ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । करोनाचा उपद्रव झाल्यानंतर राज्यातील सर्वच क्षेत्रातील आर्थिक स्थिती चिंताजनक होत चालली आहे. राज्यावरील करोनाच्या संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी सामना करुन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासाठी, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी एका ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार काम करणार आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रभावी उपायोजना करणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात १२१ करोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळल्याने राज्यातील रुग्णसंख्या २ हजार ४५५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २ हजार ३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २ हजार ४५५ झाली आहे. तर १५५ पेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या चिंते भर घालणारीच ही बातमी ठरली आहे. देशातील करोनाबाधितांचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला गेला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाउन हा ३ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ३ मे पर्यंत लॉकडाउन असणारच आहे हे उघड आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment