हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यात रविवारी सायंकाळी शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “मदन कदम यांनी काल गोळीबार केला यात दोघांचा मृत्यू झाला तीसरा व्यक्ती ही अतिशय गंभीर आहे. शंभुराजे देसाई हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. कदम हे ठाणे येथील माजी नगरसेवक आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील माजी नगरसेवक आहे. मुलाचा अपघात झाला म्हणून गोळीबार करावा ही काय मोगलाई आहे का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या कामाससुरुवात झाली. यावेळी कामकाजास सुरुवात होताच राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवरून तसेच कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही.
गारपीठीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्षांनी या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही अशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम यानं सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/xbbvQvRYIg
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 20, 2023
यावेळी पवारांनी पाटण येथील गोळीबाराच्या घटनेचाही सभागृहात उल्लेख केला. मदन कदम यांनी पाटणला काल गोळीबार केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू तर तीसरा व्यक्ती अतिशय गंभीर आहे. उत्पादनशुल्क मंत्री शंभुराजे देसाई हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत तर त्यांच्या मतदार संघातील कदम हे ठाणे येथील माजी नगरसेवक आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील माजी नगरसेवक आहे. मुलाचा अपघात झाला म्हणून गोळीबार करावा ही काय मोगलाई आहे का? असा सवाल अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केला.