हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी नंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
मी सांगितलेलं आहे, सारखं सारखं मी सांगायची गरज नाही. एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. ढगात गोळ्या मारू नका. जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल” असे अजित पवार यांनी म्हंटल.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखिल आयकर विभागाच्या छापेमारी नंतर आपला संताप व्यक्त केला होता. आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे घडत आहे. कर वसुली करण्यासाठी जर कोणाला काही शंका येत असेल तर त्यासंबंधीच्या चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र, या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणे हा या अधिकाराचा अतिरेक आहे,” असे पवार यांनी म्हंटले आहे.