हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis0 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हा शपथविधी करण्यात आला अशा चर्चाही तेव्हा सुरु होत्या. मात्र पवारांनी त्यावेळी सदेव चर्चा फेटाळून लावल्या होत्या. एवढच नव्हे तर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणून अवघ्या ८० तासांतच अजितदादा आणि फडणवीसांचे सरकार पाडलं होते. आणि राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकार आणलं. मात्र आता अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी बाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
इंदापुरात बोलताना अजित पवार म्हणाले, देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री असेल हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकलं नाही”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
दरम्यान, 2004, 2009, 2014 आणि 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करते होते. आता आपल्याला महायुतीत आपल्याला एकत्र काम करायचं असं ठरलं आहे. अंकीता पाटलांना सुद्धा मी सांगतो अजित पवार हा शब्द पाळणार आहे. उद्या बारामतीमध्ये मी प्रचाराचा नारळ फोडणार आहे. हर्षवर्धन पाटील त्यांच्या पद्धतीने सभा घेतील आणि दत्ता मामा यांती वेगळी सभा होईल आणि त्यानंतर संयुक्तिक सभा होतील. काही जणं जर चुकत असतील तर त्यांना सांगावं लागेल. समज गैरसमज होऊ देऊ नका असं अजित पवारांनी म्हंटल.