राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की नाही यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभिन्नता कायम आहे. मात्र असे असतानाच माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे असे आवाहन केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत परत एकदा चर्चा रंगू लागली आहे.

मनसेला आघाडीमध्ये घेण्याबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, ”प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यांना मानणारा असा मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना लाख लाख दीड लाख मते घेतल्याचे तुम्ही बघितले आहे. मनसेबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तसेच काँग्रेसने वेगवेळगळी मते मांडली आहेत. मात्र असेल असले तरी आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळणे गरजेचे आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे असे मला वाटते.” त्याबरोबरच शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मनधरणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबतही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ”शिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये सध्या दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यातून अधिकाधिक जागा बळकावण्याचा दोघांचाही प्रयत्न आहेत. आता एक दिवस युती झाल्याचे माहिती पडेल. आणि हिंदुत्ववादी विचारांसाठी आम्ही युती केल्याचे सांगितले जाईल,” असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Comment