हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानावरून त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “जर शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा पवारांनी दिला.
मावळ येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडून देण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची माहिती घेतली. यावेळी काही शेतकर्याना हे अनुदान न मिळाल्याचे त्यांना समजले. शेतकऱ्यांनी अनुदान न मिळाल्याचे सांगताच पवार म्हणाले की, अजून दोन टप्पे शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बाकी आहेत. या टप्प्यात अनुदान मिळणार आहे. ते जर नाही मिळाले तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असे पवार यांनी म्हंटले.
शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. जे नियमात बसतील त्यांना सरकारकडून अनुदान मिळेल. पण जे बसणार नाहीत त्यांना मिळणार नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.