अजित पवारांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अस ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. राज्यपालांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यातच आता अजित पवार हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत