प्रकल्पाबाबत माझ्याकडे सगळी माहिती, शिर्डीच्या अधिवेशनात सगळं सांगणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य करत प्रकल्पाबाबत माझ्याकडे सगळी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात सगळं सांगणार असा थेट इशारा शिंदे -फडणवीस सरकारला दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, लाखो तरुणांना रोजगार देणारी आणि करोडो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचा प्रचार आणि प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात झाला कि त्यांचेच मन त्यांना खायला लागलं आणि मग आम्ही याच्यापेक्षा मोठं प्रकल्प आणू, आम्ही असं करू, तस करू असं ते सांगतात. याला काहीही अर्थ नाही. प्रकल्पा बाबत माझ्याकडे सगळी माहिती आहे. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात मी सगळं सांगणार आहे असा इशारा अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे.

दरम्यान, राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यांनतर पुण्यात होणार वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. त्यानंतर रायगड येथील बल्क पार्क, नागपूर येथील टाटा एअरबस प्रकल्प असे मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. यावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकार वर टीका करत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी मुळेच हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले असा आरोप सत्ताधारी करत आहेत. एकूणच प्रकल्पावरून राज्यात राजकीय वातावरण अजूनही तापलं आहे.