टीम हॅलो महाराष्ट्र | पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापण्याची गडबड करणाऱ्या अजित पवार यांचं नाराजीनाट्य संपल्याचं आज पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद निश्चित झाल्यानंतर अजित पवार आनंदात असल्याचं पहायला मिळत आहे.
सोमवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतर्फे मंत्रीमंडळातील नेत्यांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक आमदार नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. यामध्ये शिवसेनेचे सुनील राऊत, तानाजी सावंत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असताना पक्षात अनेक वर्षं काम केलेले नेते या प्रकारावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. या परिस्थितीत अजित पवार यांनी या प्रकरणाचा स्वतःच खुलासा करत सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्यावर भर असल्याचं पवार पुढे म्हणाले. काही आमदार नाराज असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देताना गृहमंत्रीपद माझ्याकडे आहे हे विसरू नका असा सज्जड दमही दिला आहे.