‘मी लेचापेचा माणूस नाही, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही..’; अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला भेट देत संस्थेच्या आवारात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, ‘मी लेचापेचा माणूस नाही. गेले 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत असतो’ अशा शब्दात विरोधकांना सुनावले. कारण, अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर त्याचे हे आजारपणं खरे की खोटे याबाबत राजकिय वर्तुळात चर्चा रंगली होती. या चर्चांना आज त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “माजी उपपंतप्रधान पहिले मुख्यमंत्री चव्हणांची आज पुण्यतिथी म्हणून त्यांना अभिवादन केलं. दिवाळीपूर्वी डेंग्यूमुळे 15 दिवस वाया गेले. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही. मी माझी मतं गेल 32 वर्षे स्पष्टपणे मांडत आलो आहे. मध्यंतरी अमित शहांना भेटलो. तक्रार करण्यासाठी अमित शाहांना भेटल्याची माहिती खोटी आहे. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही”

भडकाऊ भाषण करू नये..

यानंतर त्यांनी अंतरवली सराटीत दगडफेक केलेल्या मुख्य आरोपीवर करण्यात आलेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात बोलताना, “अंतरवली सराटीतील अटकेबाबत मला माहिती नाही. त्याबाबत माहिती घेतो. आरक्षणाबाबतीत काम सुरू आहे. कोणीही भडकाऊ भाषण करू नये, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा आहे हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवले आहे. सत्ताधारी असो विरोधक असो कोणीही असो त्यांनी भडकाऊ भाषण करू नये. वाचाळवीरांनी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे” असे अजित पवार यांनी म्हणले.