कराडात अजित पवारांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; भर चौकात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा

0
228
Atul Bhosale Chhatrapati Sambhaji Raje karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कराड येथील ढेबेवाडी फाटा  याठिकाणी आज भाजपच्यावतीने अजित पवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजित पवार मुर्दाबाद’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

कराड येथील ढेबेवाडी फाटा येथे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले याच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनास मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी डॉ. भोसले म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हे अख्ख्या देशाचे आराध्य दैवत आहेत. धर्मवीर संभाजीराजेंनी देश व धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अतुल्य कार्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते. अशावेळी विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही भाजपाच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करत आहोत.

डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी यादव, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, तालुकाध्यक्ष सौ. श्यामबाला घोडके, मलकापूरचे नगरसेवक आबा सोळवंडे, कान्हा लाखे, मंजिरी कुलकर्णी, सीमा घार्गे, हर्षवर्धन मोहिते, महेश कुलकर्णी, तानाजी देशमुख, सुरज शेवाळे, आबा गावडे, अण्णासो काशीद, जमीर शेख, सूर्यकांत खिलारे, हणमंतराव जाधव, बाळासो बागडी, राजू मुल्ला, बाळासाहेब घाडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.