अजित पवारांच्या पुतळ्याचा अजिंक्यताऱ्यावरून कडेलोट; साताऱ्यात भाजपकडून निषेध

Ajit Pawar bjp Satara Ajinkyatara Fort
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. सातारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज राजधानी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या वक्त्याचा निषेध नोंदवण्यात आला.

सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर आज सकाळी भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा सोबत आणला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत किल्ल्यावर अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

यावेळी निलेश नलवडे म्हणाले की, अजित पवर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे विधान केले. त्यांनी केलेल्या विधानाबद्दल एक तर त्यांनी माफी मागावी. नाही तर अजित पवार ज्या ज्यावेळी सातारा येथे येतील त्या त्या वेळी आम्ही त्यांना फिरून देणार नाही. यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करू. पवारांनी केलेल्या विधानाचा निषेध करत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनही देणार आहोत.