हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा पार पडणार होता. मात्र आता हा दौरा रद्द झाल्याची बातमी समोर येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगरचा दौरा रद्द केल्याचे सांगितले जात आहे. आज गंगापूर येथील 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होते. तसेच, अजित पवार संभाजीनगर येथील विकास कामांच्या ठिकाणांना भेट देणार होते.
मुख्य म्हणजे, गंगापूर येथे आयोजित करण्यात 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अजित पवारांसह सर्वच राजकीय नेत्यांच्या सहभागावर मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवला होता. मराठा आंदोलकांनी यासंबंधित निवेदन गंगापूर तहसीलदारांनाही दिले होते. यामुळेच, अजित पवारांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, सध्या तरी हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे पवारांनी हा दौरा रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मंथन मेळावा पार पडल्यानंतर अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. आजच्या या दौऱ्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार होते. यानंतर ते साबणे फर्निचर मॉलला आणि गजान मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देणार होते. दुपारच्या वेळी अजित पवार जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार होते. यानंतर चार वाजता त्यांचे पत्रकार परिषद पार पडणार होती. अशाप्रकारे अजित पवार यांचा संभाजीनगर दौरा नियोजित करण्यात आला होता. मात्र आता हा दौरा रद्द झाला आहे.